धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांची जयंती महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र धाराशिव यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. ए. डी. जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. जाधव यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकण्याचा सविस्तर प्रयत्न केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. रमेश दापके हे होते. डॉ. दापके यांनी उपस्थित सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसमोर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनामध्ये आलेले चढ उतार यावर त्यांनी भाष्य केले.
तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांचा परिचय करून देत यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणीना उजाळा दिला. यशवंतराव चव्हाण यांच्या अंत्ययात्रेला मी स्वतः उपस्थित होतो त्यावेळी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून प्रचंड जनसागर त्या ठिकाणी दाखल झाला होता. अशा प्रकारच्या आठवणींना त्यांनी प्रस्ताविकामध्ये उजाळा दिला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मराठी विभागाचे प्रा.डॉ अरविंद हंगरेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र धाराशिव चे समन्वयक प्रा.डॉ. संदीप देशमुख यांनी मानले.यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.