धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचे दहन केले व 26 जानेवारी 1950 ला भारताला भारतीय संविधान दिले. या ऐतिकासिक घटना आहेत. संविधान रक्षणाचा रस्ता हा मतदानाच्या पेटीतून जातो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे लागेल. असे प्रतिपादन प्रा. विक्रम कांबळे यांनी केले. संविधान संरक्षण समिती धाराशिवच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय संविधानासमोरील वर्तमानातील आव्हाने या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांचे स्वागत राम चंदनशिवे यांनी केले. व्याख्याते प्रा. विक्रम कांबळे यांचे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान संरक्षण समितीचे प्रा. दिनकर झेंडे यांनी केले. मार्गदर्शन करताना 

अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ॲङ अजित कांबळे यांनी मांडले. यावेळी रमाई फाऊंडेशनचे पृथ्वीराज चिलवंत, हरीभाऊ बनसोडे, दादासाहेब जेटीथोर, प्रा. महिंद्र चंदनशिवे, प्रा. अंबादास कलासरे, सुनिल बनसोडे, राहूल राऊत, प्रभाकर बनसोडे, राजेंद्र अंगरखे, सुदेश माळाळे, नितीन माने, भारती बौध्द महासभेचे सचिव विजय बनसोडे, दिलीप वाघमारे, किरण कांबळे, विनोद कांबळे, ॲङ के.टी. गायकवाड, मारुती पवार, ॲङ इंद्रजित शिंदे, नागनाथ गोरसे, बापु धावारे, एस.एन. मदने, उमेश कांबळे, राकेश साबळे, प्रा. गोरोबा झेंडे, ॲङ झीनत प्रधान, सुरेखा जगदाळे व शहरातील आंबेडकर प्रेमी जनता, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top