तुळजापूर (प्रतिनिधी) -   तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीची संख्या वाढत जात आहे. यात मुंबई बरोबर आता तुळजापूर येथील आरोपी पोलिस पकडत असल्याने मुंबई ते तुळजापूर हे ड्रग्ज प्रकरण प्रवास आता तुळजापूर तालुक्यात येवुन पोहचला आहे. आता तुळजापूर तालुक्यातील व शहरातील कोन कोन यात अडकणार याची उत्सुकता लागली आहे.

ड्रग्ज  प्रकरणी पोलिस तपास सखोल चालु असल्याचे सध्याच्या तपास प्रक्रियेवरुन दिसुन येत आहे. मुंबई तुन सुरु झालेला तपास गल्ली म्हणजे तुळजापूरात पोहचला आहे. प्रथम तामलवाडी ता. तुळजापूर येथे अमित आरगडे सह अन्य दोन जण ताब्यात घेतले. नंतर मुंबई येथील संगीता गोळे नंतर संतोष खोत याला पकडले. नंतर पंचायत समिती माजी सभापतीचा मुलगा सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला पोलिसांनी ताब्यात  घेतले. याच व्यक्तीने    तुळजापूरात  अनेकांना नादी लावुन ड्रग्ज  आणल्याची  चर्चा सर्वञ होत आहे. याच्या चौकशीतुन ड्रग्ज तस्करी रँकेट उघडकीस येईल अशी चर्चा शहरासह तालुक्यात होत आहे. याचे लागेबंधे  राजकिय मंडळी, अधिकारी यांच्याशी असल्याचे बोलले जात आहे. यांच्याशी जवळीक असणाऱ्या मंडळीचे धाबे दणाणुन गेले आहेत.  तुळजापूर शहरात ड्रग्जचा व्यवसाय कुणाचा छञ छाया खाली चालतो याचाही शोध घेण्याची मागणी होत आहे. देशातील पविञ तिर्थक्षेञ ड्रग्जमुळे बदनाम झाले आहे. त्यामुळे याचाशी संबंधित मंडळीवर कारवाई करुन तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज मुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व पालकमंञी प्रताप सरनाईक यांच्याकडे  स्थानिक नागरिक विशेषता महिला वर्ग व भाविक करीत आहेत.

 
Top