तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नळदुर्ग रोडवरील आयडीबीआय बँके समोर स्कुटीच्या डिग्गीत ठेवलेली साडेतीन लाख रुपये रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना सोमवार दि. 10 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, संदेश रंगनाथ हांगरगेकर, रा.हंगरगा. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे ज्युपीटर टीव्हीएस कंपनीच्या स्कुटी क्र एमएच 25 एस 2606 ची डिग्गी उघडून डिग्गीमधील पिवळ्या कॅरीबॅमध्ये ठेवलेली रोख रक्कम 3 लाख 50 हजार रूपये ही सोमवार दि.10 मार्च रोजी 12.30(12.25 ते 12.28 वाजेचा सुमारास आयडीबीआय बॅकेसमोर तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी संदेश हांगरगेकर यांनी दिल्यावरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.