तुळजापूर (प्रतिनिधी)- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता, प्रेरणादायी दैदिप्यमान इतिहास दाखवणारा छावा चित्रपट तुळजापूर शहरातील नगर परिषद शाळा क्र 2 च्या विद्यार्थ्यांना आनंद दादा कंदले मित्र परिवार च्या वतीने दाखवण्यात आला.
सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांना चित्रपट गृहात बसवण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक विजय कंदले, नरेश अमृतराव, मुख्याध्यापक गणेश रोचकरी सर, महेंद्र कावरे सर, राम चोपदार, सागर कदम, जीवनराजे इंगळे, अण्णा देवकर, महेंद्र पाटील, बाळासाहेब जेटीथोर,सुज्ञानी गिराम, किरण लोहारे,विद्यादेवी स्वामी, शिवाजी डाके सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद उपस्थित होते.