धाराशिव (प्रतिनिधी ) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्यसनमुक्तीवर आधारित वक्तृत्व,चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात महिला व बालविकास कल्याण समितीचे अध्यक्ष श्री विजयकुमार माने यांनी याप्रसंगी बोलताना वरील उद्गार काढले.
व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे.व्यसनाने व्यक्तींना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.यासाठी आपण व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून महिला व बालविकास कल्याण समितीचे सदस्य श्री दयानंद काळुंके हे उपस्थित होते. दयानंद काळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की , कोणत्याही व्यसनापासून दूर राहायचे असेल तर संयम अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षण प्रसार आणि व्यसनमुक्ती हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक डॉ. सावता फुलसागर हे होते.
याप्रसंगी व्यसनमुक्ती महाविद्यालय स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉ. दत्तात्रेय साखरे यांनी केले सूत्रसंचालन डॉ.एस एस गायकवाड यांनी केले तर आभार प्रा . बालाजी नगरे यांनी मानले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.