धाराशिव (प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यातील आन्वा (ता.भोकरदन) येथील तरुणाला लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.6) निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा गावामधील धनगर समाजातील कैलास बोराडे या तरुणाला मंदिरात आल्याच्या कारणावरुन लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याआधीच परभणी, बीड येथील घटनांमुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे समोर आलेले आहे. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच असे कृत्य जातीय तेढ निर्माण करणारे आहे.

निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे, मिलिंद चांडगे, हरिदास शिंदे, दिनेश बंडगर, इलियास मुजावर, ॲड. बुद्धभूषण माने, संजय थोरात, अनिरुद्ध कावळे, विनोद कदम, प्रशांत कांबळे, सम्राट वाघमारे, बंटी मुंडे, रणजित बनसोडे, संजय थोरात, सम्राट वाघमारे, अनंत दहिहंडे आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top