कळंब (प्रतिनिधी)- वादग्रस्त स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबनात्मक व्हिडीओ बनवत तो सोशल मिडिया वर प्रसारित केल्यामुळे महाराष्ट्रासह कळंब तालुक्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत, याबाबत शिवसेना नेते अजित पिंगळे व कळंब शिवसेनेच्या वतीने, कळंब पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये कुणाला कामराने वापरलेल्या अपशब्दामुळे तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने, महाराष्ट्रामधील एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम असणाऱ्या व्यक्तींच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवण्याचे काम कुणाला कामरा याने केलेले आहे, त्यामुळे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे शिवसेनेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी उपस्थित धाराशिव शिवसेना नेते अजित पिंगळे, तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हूलजुते, विकास कदम, पिनू जाधवर, राजू भाई सय्यद, सुरेश शिंदे, सुमित रणदिवे, डॉ. बंडू तावरे, अखिल काझी, राज सुरवसे, रोहन पांगे, दत्ता शेंडगे, ओम शिंदे,सागर शिंदे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.