धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.टी. पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय व पुणे येथील नामांकित कंपनी अमोसॉफ्ट टेक्नो वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये दिनांक 29 /3/2025 रोजी  सामंजस्या करार संपन्न झाला.

सदरील कंपनी इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे सदरील कंपनीचे मुख्य ऑफिस पुणे येथे कार्यरत असून कंपनीचा व महाविद्यालयाचा सामंजस्य करारामुळे के .टी. पाटील संगणकशास्त्र महाविद्यालयातील या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कंपनीद्वारे महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूद्वारे थेट नोकरीची संधी महाविद्यालय निर्माण करून देणार आहे.

या समांजस्य करारासाठी कंपनीतील सौ. मेघा अमोल वनकळस सौ. मेघना भांगे, श्री.अमोल वन कळस, प्रसन्न रंणभोर यांची उपस्थिती होती. तसेच संस्थेतर्फे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील व महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अजित मसलेकर यांची उपस्थिती होती.

या झालेल्या यशस्वी सामंजस्य कराराबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रसुधीर के. पाटील,सरचिटणीस सौ.प्रेमाताई सुधीर पाटील ,संस्था सदस्य श्री संतोष कुलकर्णी आदींनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे कर्मचारी प्रा .शुभम पाटील सर प्रा .रघुवेद्र मुंढे सर, प्रा. अफ्रिन पटेल , प्रा. अक्षता भदे, प्रा. कल्पना वराळे या सर्वांनी परिश्रम घेतले.

 
Top