परंडा (प्रतिनिधी)-भारताने आत्तापर्यंत जगाला अनेक वैज्ञानिक खगोलशास्त्रज्ञ गणितज्ञ असे अनेक शास्त्रज्ञ दिलेले आहेत त्यापैकी भारताचे नाव संपूर्ण जगात अभिमानाने उंचावणाऱ्या ते अनेक महान व्यक्ती पैकी सी व्ही रमण हे एक आहे असे प्रतिपादन डॉ.आर.व्ही. कठारे यांनी रा.गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत केले.ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परांडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सी व्ही रमन व्याख्यानमालयाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंदार गायकवाड तसेच श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ रामकृष्ण कदम यांची उपस्थिती होती. 

यावेळी व्यासपीठावर कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.व्ही कठारे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने ,स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे, डॉ. गजेंद्र रंदील ,डॉ अतुल हुंबे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.महेशकुमार माने यांनी केले.डॉ. मंदार गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी या विषयावर तर डॉ. रामकृष्ण कदम यांनी सी व्ही रमण यांचे जीवनकार्य व संशोधन या विषयावर व्याख्यान दिले.पॉवर पॉइंटच्या माध्यमातून प्रोजेक्टवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . डॉ.गजेंद्र रंदिल यांनी अध्यक्षीय समारोप केला.

या कार्यक्रमासाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . महाविद्यालयातील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व सायन्स फोरम च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ अतुल हुंबे आणि डॉ सचिन चव्हाण यांनी केला.शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ संतोष काळे भाग्यवंत रोडगे यांनी सहकार्य केले .

 
Top