तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे सहा कावळयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे राजेंद्र मोरे यांच्या शेतात सहा कावळे मृत्यूमुखी पडल्याचे तेर येथील पशुधन पर्यवेक्षक भारत कुंभार यांना 22 मार्चच्या सकाळी कळाल्यानंतर त्यानी वरीष्ठाशी संपर्क साधून वरीष्ठाच्या आदेशाने मृत कावळे जाळून टाकले. यानंतर मृत कावळा मरताच तात्काळ तो मृत कावळा प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती पशुधन पर्यवेक्षक भारत कुंभार यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.मूकुंद तावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत्यू झालेले कावळे या ठिकाणापासून एक किलोमिटर अंतरापर्यंत जाच्याकडे कोंबड्या आहेत त्यांनी कोंबड्यांचे खुरवडे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. असे आवाहन पशुधन पर्यवेक्षक भारत कुंभार यांनी केले आहे.