भूम (प्रतिनिधी)- संयोगिता संजय गाढवे महिला मंडळाच्या वतीने खेळ खेळूया पैठणी जिंकूया संसार उपयोगी वस्तू भव्य बक्षीस योजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध खेळ महिलांसाठी घेण्यात आले. सिने तारखा माधवी निमकर ह्या या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरल्या. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांच्या वतीने या कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेलिब्रेटी अँकर आर जे अक्षय घोळवे याने महिलांना मंत्रमुग्ध केले. या वेळी नगरपरिषदे समोरील प्रांगणात या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संयोगिता गाढवे या होत्या. यावेळी जे एस पी एम संकुलाच्या समन्वयक ज्योती धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संयोगिता संजय गाढवे महिला मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 8 मार्च रोजी खेळ खेळूया पैठणी जिंकूया या संसार उपयोगी वस्तू भव्य बक्षीस योजना लकी ड्रॉ मधील प्रथम बक्षीस स्कुटी मोहिनी बालाजी चौधरी, द्वितीय बक्षीस उज्वला बाबासाहेब पोळ यांना वॉशिंग मशीन या प्रमाणे फ्रीज, सोफासेट, कुलर आदी बक्षीसे पुढील महिलांना पूजा चक्रधर नाईकवाडी, राणी कानिफनाथ पवार, इंदुबाई अशोक मोरे, चंद्रकला तानाजी राजगुरू, धनश्री प्रज्ञावंत गवळी, पूर्वा सिद्धोधन शिंदे, रीना धनंजय होगाडे, शमा तय्यब शेख यांना, कोमल तुषार माळी यांना देण्यात आले.
लकी ड्रॉसाठी दैवशाला संजय साबळे, कोमल सुरज गाढवे, सोनाली पंडित ढगे, अर्चना रंजीत साळुंखे, प्रतीक्षा अभिजीत शेटे, संगीता संभाजी भोसले, अंजली नारायण वरवडे, भारती बालाजी माळी, वैष्णवी बालाजी अंधारे, अमृता अक्षय भोगील, शिल्पा अमोल गायकवाड यांच्याकडून ही बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सई संजय गाढवे यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील महिलानी उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन गुंजाळ यांनी केले.