तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाडातील तामलवाडी हे शेवटचे गाव असून, पश्चिम महाराष्ट्रातुन ड्रग्ज मराठवाड्यात आणणाऱ्या रँकेटसाठी तामलवाडी ड्रग्ज तस्करांचे प्रवेशव्दार बनल्याचे दिसुन येत आहे. ड्रग्ज बाबतीत प्रथम कनेक्शन मुंबई होते. मुंबई ड्रग्ज कनेक्शचा मुळावर पोलिसांनी घाव घालत असतानाच सोलापूर ड्रग्ज वितरण कनेक्शन माञ चालुच होते. यामुळे ड्रग्जचे पाळेमुळे किती खोल गेले आहेत हे स्पष्ट होते. मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात पोहचलेले ड्रग्ज आता मुंबई -सोलापूर मार्ग मराठवाड्यात पोहचल्याचे या घटनेवरुन दिसुन येते.
विशेष म्हणजे महामार्ग रस्त्यावरून वाहनांनी हे ड्रग्ज येत असल्याने येथील सुरक्षा यंञणेत ञुटी असल्याचे समोर येत. महामार्ग वाहतुक शाखेचे पोलिस भाविकांची वाहने अडवतात. त्यांना ड्रग्ज, गांजा, गुटखा घेवुन जाणारी वाहने दिसत नाहीत का? असा सवाल विचारला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन आहे. तामलवाडी हे सोलापूर हद्दी लगत असल्याने येथे सोलापूर येथील अवैध धंदेवाईक मंडळीचा सतत राबता असतो अशी चर्चा आहे. या मंडळीचे हे सोयीचे गाव आहे. विभाग बदलत असल्याने सोलापूर येथे अवैध धंद्यांवर पोलिस कारवाई करताच ही मंडळी तामलवाडी येथुन सोलापूरच्या अवैध धंद्याची माँनिटरींग करतात व सोलापूर येथील पोलिस कारवाई शिथील होताच लगेच सोलापुरात जावुन पुनश्च धंदे सुरु करतात असे बोलले जाते. त्यामुळे तामलवाडी पोलिस स्टेशन जिल्हयात चर्चेत आहे.
त्यामुळे येथे जादा काळ पोलिस अधिकारी टिकत नाही. या पोलिस स्टेशनची व्याप्ती ग्रामीण भागात असल्याने येथे अनेक गावांमध्ये झिरो पोलिसांचा बोलबाला असल्याची चर्चा आहे. अवैध गौण खनिज उत्खनन, वाळु, अवैध धंदे, अवैध प्रवाशी वाहतुक, इंधन चोरी यासाठी हा भाग चर्चेत आहे. कारण या पोलिस स्टेशन अंतर्गत गावे सोलापूर जिल्हा हद्दीशी लगत आहेत. ड्रग्ज प्रकरणी पोलिस अधिक खोलीत गेल्यास बीड आकाचे कनेक्शन पुढे येईल असे बोलले जात आहे. ड्रग्जमध्ये प्रचंड पैसा मिळत असल्याने अनेक तरुण यात चुकुन अडकल्याचे दिसुन येत आहे. मुंबई येथील ड्रग्ज व्यवसायीकांनी कोट्यावधी रुपयाची माया जमवल्याचे समजते. ड्रग्ज रँकेटमध्ये लहान मुले अडकले असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.