धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील समतानगर भागातील रस्त्यासह विविध विकासकामांबाबत समता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ति पुजार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, छत्रपती संभाजी चौक ते डॉ. बाबासाहेब अबिडकर चौक या रस्त्याची हॉट मिक्स कामाची प्रशासकीय मान्यता नगर परिषद धाराशिव यांनी 28 मार्च 2021 मध्ये दिलेली आहे. सदर रस्त्याचे प्रत्यक्ष काम मागील तीन ते चार महिन्यामध्ये सुरू झाले होते. त्यामध्ये सदरचे कामकाज हे अर्धवट केलेले आहे. सदर कामामध्ये जुने टीव्ही सेंटर ते विजर्सन विहिर हा भाग पूर्णतः वगळून इतर काम झालेले आहे. तसेच सन 2021 2022 मध्ये नगर परिषदेने नवीन विर्सजन विहिर बांधणे व विसर्जन विहिर ते एचडीएफसी बँकेपर्यंतचा कॉकीट रस्ताचा कामास प्रशासकीय मान्यता देवून वर्कऑर्डर देवून ठेकेदाराकडून हे काम देखील अर्धवट करून घेतलेले आहे यामध्ये विर्सजन विहिर ते एचडीएफसी बँकेपर्यंत काँक्रीट रस्ता अद्याप केलेला नाही. तरी या दोन्ही कामाची नगर परिषदेकडून माहिती घेवून 15 मार्च 2025 पूर्वी सदरची दोन्ही कामे सुरू करणे बाबत नगर परिषदेला आदेश द्यावेत. सदरचे अर्धवट झालेल्या कामामुळे रस्त्यावरील खड्डे व धुळीमुळे समता नगरवासीयांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषदेने प्रशासकीय मान्यता देवून वर्कऑर्डर देवूनही कामे अर्धवट झालेली आहेत. परंतु नगर परिषद प्रशासन गप्प का आहे? याची माहिती घेऊन कामकाज त्वरीत सुरू करावे अन्यथा समता नगरवासीय सर्व नागरीक ही आंदोलन करतील. त्यानंतर होणार्या परिणामाची जबाबदारी ही सर्व संबंधीत प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर समता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाटगे, कैलास पानसे, कुमार पारे, अतुल पाटील, नारायण पाटील, एच. एम. लोमटे, रामचंद्र जोशी, बिभीशन माळी, एस. एस. जगदाळे, सौ. सुरेखा गोकुळ कदम यांची स्वाक्षरी आहे.