तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील डिजिटल, पोस्टर, बॅनर लावल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. 10 मार्च रोजी 29 डिझीटल बँनर लावल्यावरुन उत्पन्न रुपातुन एकाच दिवशी चक्क नगरपरीषदला चौतीस हजार रुपये उत्पन्न जमा झाले.
डिझीटलबँनर परवानगी शिवाय लावु नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इषारा नगरपरीषद दिल्याने मंदीर परिसर, चौकात, बोळात डिझीटल बँनर वर झळकणारे दादा, अण्णा, भाऊ, भैय्या झळकण्याचे कमी झाले. यामुळे शहरातील महत्वाचे चौक रोडनी डिझीटलबँनर पासुन मोकळा श्वास घेतला. शहरातील छञपती शिवाजी महाराज पुतळा, गोलाई, नवेजुने बसस्थानक, धाराशिव रोड, सोलापूर रोड डिझीटल बँनर येथे लावण्यात येणाऱ्या बँनरव रक्युआरमुळे डिझीटल बँनर साईज सहज उपलब्ध होत असल्याने लावणारे मंडळी त्याचे चाँर्जस भरत आहे. यामुळे फुकटछाप मंडळीना माञ चाप बसला आहे. सध्या डिझीटलबँनर माध्यमातून महीन्याला सत्तर हजार रुपये उत्पन्न मिळते. दोन महिन्यात दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.10 जानेवारी 2025 पासुन ही कारवाई सुरु केली आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर परिसर माञ कायम डिझीटल बँनर मुक्त ठेवण्यात आला आहे. तसेच धाराशिव महामार्ग रस्ता मधोमध असणाऱ्या खांबावर छोटे डिझीटलबँनर लावलेले असतात त्यातुन सहा हजार रुपये नगरपरीषद ला उत्पन्न प्राप्त झाले आहे.
शहराच्या विविध भागांमधे बॅनर, फ्लेक्स लावायचे आहे ते ठिकाणी निश्चित करून देण्यात आली होती. अस्ताव्यस्त व अनाधिकृत फ्लेक्स, डिजिटल बॅनर तसेच तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे पवित्र तिर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भाविक -भक्त दर्शनासाठी येतात आशा प्रकारे केलेल्या जाहिरातीमुळे भक्ता मध्ये नाराजीचा सूर दिसत होता. या पार्श्वभूमीवर क्यूआर कोड शिवाय कोणतीही जाहिरात दिसल्यास संबंधित व्यक्ती व कंत्राटदार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला जाईल. असा इशारा देण्यात आला होता. यामुळे नगरपरीषद उत्पन्नात वाढ होत असुन तिर्थक्षेञ तुळजापूरचे विद्रुपीकरण माञ थांबण्यास मदत झाली आहे. नगरपरीषदचे कर्मचारी विशाल लोंढे व त्याचे सहकारीनी यावर लक्ष ठेवुन आहेत.