उमरगा (प्रतिनिधी)- बुध्दगया येथिल महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात यावे. या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभेमार्फत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

उमरगा तहसीलदार याच्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुध्दगया येथे गेल्या पंधरा दिवसांपासून बौध्द भिक्खू आणि बौध्द समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे. तथागत गौतम बुध्द यांची जन्मभुमी असलेली बुध्दगया येथील बौद्ध विहार बौध्दांचे असावे. त्यामुळे चालू असलेल्या आंदोलनास भारतासह जगभरातील बौध्द बांधव आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. गौतम बुध्दाच्या या पवित्र स्थळी ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्त करून तात्काळ महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात भन्ते सुमंगल, रिपाइंचे जेष्ठ नेते हरीश डावरे, जिल्हा बँकचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, काँग्रेसचे दिलीप भालेराव, राम गायकवाड, ॲड मल्हारी बनसोडे, दत्ता रोंगे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकाळजे,विजमाला धावारे, मच्छिंद्र सरपे, तानाजी माटे, शहाजी मस्के, बौद्ध महासभेचे संतोष सुरवसे, किरण कांबळे, अविनाश भालेराव, दिलीप सोनकांबळे, ब्रम्हानंद गायकवाड, नेताजी गायकवाड, प्रा गौतम सुरवसे, विनोद कांबळे, सोनाली कांबळे,विद्या कांबळे आदींसह समता सैनिक दल व बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रास्ताविक अनंत कांबळे यांनी केले. सुत्रसंचलन राजेंद्र सुर्यवंशी यांनी केले. संतोष सुरवसे यांनी आभार मानले.

 
Top