तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद गेल्या तीन वर्षापासून स्वयंघोषित नगराध्यक्ष तुळजापुरी वाल्मीक कराड तुळजापूरकरच्या नियंत्रनात हुकूमशाही पद्धतीने गहानखत असल्याचे चर्चा शहरात होत आहे.

शहर स्वच्छतेचा ठेका, पाणीपुरवठा, बांधकामे, यात्रा अनुदान, सुलभ शौचालय, ओसाड बाग बगीचे, विद्युत व्यवस्था इत्यादी कामात माजी नगरसेवक कर्मचाऱ्यांना राजकीय वजन वापरून शिवीगाळ करून दहशतीखाली कामात अनियमितता करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून स्वतःची वर्षाकाठी दोन-तीन कोटीची तुंबडी भरीत आहे. असा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळुंके यांनी नुतन जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन दिलेले आहे. या निवेदनावर रवींद्र साळुंके यांची स्वाक्षरी आहे.


 
Top