तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी येथे कटारे स्पिंनिंग मिल चा पाठीमागील बाजुला लागलेली आग नगरपरीषद अग्निशमन दलाने विझवल्याने मोठे अनार्थ टळुन अर्थीक नुकसान टळले.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावापुढील बाजुस पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा सरहद लगत कटारे स्पिंनिंग मिलचा पाठीमागील बाजुला असलेल्या गवत व पालापाचोळ्यास बुधवार सांयकाळी सवासात वाजता अचानक आग लागली. ही माहीती नगरपरीषद अग्निशमन दलास मिळताच पंधरा मिनीटात आग स्थळी पोहचुन अर्धा तासात आग विझवल्याने कटारे स्पेनिंग मिल पर्यत ही आग पोहचु न दिल्याने अर्थिक नुकसान टळले. नगरपरीषद अग्निशमन दलाचे प्रमुख डी. एन. देवकते यांच्या मार्गदर्शन खाली ही आग विझवण्यात आली.