धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त* जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, चिलवडी या ठिकाणी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद  धाराशिव व ग्रामीण बीट धाराशिव, आयोजित

 जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान  व सांस्कृतिक महोत्सवात  संजीवनी विद्यालय, चिलवडी ता. जि. धाराशिवने सहभाग घेऊन आपल्या  कलागुणांचे सादरीकरण केले. विद्यालयाच्या वतीने सदर कार्यक्रमात ६ वी ते ८ वी  या गटात गीत - झुलवा पाळणा* ९ वी ते १२वी या गटांमध्ये गीत - आम्ही शिवकन्या  आदि सहभाग नोंदवला होता .

यापैकी नववी ते बारावी या गटामध्ये आपल्या विद्यालय तर्फे कलागुण संपन असे गीत आम्ही शिवकन्या सादर करून द्वितीय क्रमांकास आयोजकांनी ३१०० रु रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शिंदे  यांना उपक्रमशील मुख्याधापिका म्हणून आज महिला जागतिक दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. 

या यशाबद्दल   भोगावती  शिक्षण प्रसारक मंडळ चिलवडी  संस्थेचे संस्थापक सचिव प्रा .  के. वाय. जाधव , शिक्षण विस्ताराधिकारी ग्रामीण बीट धाराशिव बापू शिंदे , केंदप्रमुख  निलेश नागले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापिका सौ.शिंदे यांचे हार्दिक  अभिनंदन केले .

 
Top