धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला या भागातील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध होत आहे. शेतकर्‍यांच्या मागण्याची दखल घेतली जात नसल्यामुळे धाराशिव तालुक्यातील नितळी येथील येथे महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेल्या मोनार्क सर्व्हेअर अँड इंजिनीअरिंग कन्सल्टन्सी प्रा. लि. पुणेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सीमांकन करण्यास विरोध केला. त्यामुळे पथकाला आल्या पावली परत जावे लागले.

शेतकर्‍यांच्या तीव्र आंदोलनामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शक्तीपीठ महार्गांना वगळण्यात आलेले आहे. परंतु धाराशिव भागातील महामार्ग अद्याप वगळण्यात आलेला नाही. त्यामुळे शक्तीपीठ महामहार्गाविरोधात दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा रोष वाढत आहे. दरम्यान रविवारी नितळी भागात महामार्गाचे सीमांकन करण्यासाठी मोनार्क सर्व्हेअर अँड इंजिनीअरिंग कन्सल्टन्सी प्रा. लि. पुणेचे पथक पोहचले. तेव्हा शक्तीपीठ महामार्गासाठी शेतजमिनीची मोजणी होऊ देणार नाही, पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. यापूर्वीही शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे. महामार्गासाठी आमची जमीन कोणत्याही प्रकारे देणार नाहीत, असे शेतकर्‍यांनी ठणकावले. शेतकर्‍यांची आक्रमक भूमिका लक्षात घेऊन पथक आल्या पावली परतले.

आंदोलनात नितळी शिवारातील शेतकरी नामदेव तुकाराम जगताप, लहू शिवाजी जगताप, नामदेव किसन रंधवे, किसन काकडे, व इतर शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 
Top