धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामकरवाडी ता. वाशी जि. धाराशिव येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती. मनिषा उत्तमराव थडवे यांना जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.
मातृसेवा फाऊंडेशन ठाणे, यशोमंगल एज्युकेशन कन्सल्टन्सी हिंगणघाट वर्धा, विलास व्हटकर मुंबई आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने *'राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२५'* या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील, तंत्रस्नेही, शिक्षिका श्रीमती. थडवे मनिषा उत्तमराव यांना हा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामकरवाडी ता. वाशी जि. धाराशिव या शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी लेख, काव्यलेखन, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेतलेले आहेत. गावातील द्विशिक्षकी वस्तीशाळा टिकवण्यासाठी, विद्यार्थी उपस्थिती व पटसंख्या वाढविण्यासाठी, गळती थांबविण्यासाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळाव्यात यासाठी त्यांनी स्वखर्चातून विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा व गुणवत्तावाढीत त्यांचा झालेला सकारात्मक परिणाम यावर सादर केलेल्या प्रस्तावाची निवड होऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .