धाराशिव  (प्रतिनिधी) - शहरातील शम्स चौकातील हायमस्ट पोल (विद्युत पोल) लाईट बंद पडली असून लाईटची छत्री तुटलेली आहे. रमजान ईद सुरू असून या ठिकाणी रात्रीच्या सुमारास गर्दी असते. मात्र लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो पोल दुरुस्त करून लाईटची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे धाराशिव शहराध्यक्ष काझी फर्मान अबुल फताह यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे दि.२१ मार्च रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ईद उल फीत्र (रमजान ईद) सुरू आहे. ईद जवळ आली असून ईदगाह मैदान व दर्गाह मैदानावर मंडप, चटई, बॅरीकेटींग व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील काकडे, आबा इंगळे, जुल्फेकार काझी, मगबुल टकारी, अहेमद कुरेशी, फेरोज पठाण, अलीम पठाण, महेमूद मुजावर, जाकीर पठाण, अल्लाउद्दीन पटेल, फदाह सिद्दिकी, असलम मुजावर, रज्जाक शेख, पुष्पकांत माळाळे व सत्तार शेख यांच्या सह्या आहेत.

 
Top