उमरगा,(प्रतिनिधी)- तालुक्यातील कराळी येथिल कपिलवस्तू बुद्ध विहार परिसरात शनिवारी (दि 22)होत असलेल्या विशाल बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी करण्यात आली असून धम्म परिषदेत मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या धम्मपरिषदेत पूर्णा येथिल भदन्त डॉ उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेसना होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री संजय बनसोडे,हे असून धम्म परिषदेचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.स्वागताध्यक्ष दिलीप भालेराव,आहेत तर परिषदेचे संयोजक भदन्त सुमंगल हे आहेत.या धम्मपरिषदेत पूज्य भन्ते पय्यांनंद थेरो,भन्ते धम्मसार थेरो,भन्ते सुमेध नागसेन,भन्ते कश्यप,भन्ते अमरज्योती यांची धम्म प्रवचने होणार आहेत.प्रारंभी भिक्षू संघाच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण होणार आहे.पाली पूजा झाल्यानंतर भीम बुद्ध गीतांचाजंगी कार्यक्रम होणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी अमरावतीचें खासदार बळवंत वानखेडे,आमदार डॉ सिद्धार्थ खरात,आमदार राज्यु खरे,कर्नाटकाचे माजी मंत्री सतीश धारकुळी,उद्योगपती पद्मश्री कल्पनाताई सरोज,अनु जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अडँ धर्मपाल मेश्राम,रत्नदीप गायकवाड, डॉ कमलाकर कांबळे, डॉ श्रीकांत गायकवाड, बौद्धांचार्य मिलिंद कांबळे हे करणार आहेत या वेळी माजी साखर संचालक डी.आय.गायकवाड, माजी अति जिल्हाधिकारी राजकुमार सागर, मनोहर सूर्यवंशी, सिद्धार्थ भालेराव, श्रीमंत सुरवसे,प्रा किरण सगर उपस्थित आहेत.या परिषदेत मोठया संख्येने बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष विलास खिल्लारे,उपाध्यक्ष एम एस सरपे,सचिव संजीव ओव्हाळ,कोषाध्यक्ष कैलास शिंदे,डी.टी.कांबळे यांनी केले आहे.
मोफत आरोग्य शिबीर
डॉ के डी शेंडगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचें प्रमुख डॉ आर डी शेंगगे आणि त्यांची संपूर्ण टीम या परिषदेत सहभागी नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी करून औषध उपचार करणार आहेत. धम्मदेसना आणि आरोग्य सुविधा हा दुहेरी कार्यक्रम धम्म परिषदेत घेण्यात येत आहे.