धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघ आणि लघुउद्योग भारती संघटनेच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी व्यापाऱ्यांना संघाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांच्या समस्या याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांनी व्यापारी संघाचे आणि लघुउद्योग भारतीच्या कार्याचे कौतुक करून व्यापाऱ्यांना येत असलेल्या समस्याबाबत लवकरच एक बैठक आयोजित करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे बाबत आश्वासित केले. तत्पूर्वी व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी पुजार यांचा फुलांची कुंडी देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा धाराशिव व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव, सचिव महेश वडगावकर,संजय मोदाणी, संघटन सचिव अभिलाष लोमटे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनाजी आनंदे, शाम बजाज, राजाभाऊ काळे, बापु सुर्यवंशी, अविनाश काळे, नितीन फंड, विशाल थोरात, संग्राम शिंदे,अझहर खान, अभयसिंह राजेनिंबाळकर, सराफ सुवर्णकार अध्यक्ष कपिल शर्मा, नितीन नायर, सुभाष शेट्टी, पी.आर. काळे, संजय देशमाने , राजु जानवाडकर, अतुल अजमेरा, दशरथ धुमाळ, राजाभऊ आवटे सी.ए सचिन बांगड उपस्थित होते.