तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडगाव लाख ते कार्ला हा सहा किलोमीटर  शिवरस्ता अखेर पंधरा वर्षानंतर महसुल प्रशाषणाने अतिक्रमण मुक्त केल्याने 76 शेतकऱ्यांचा शेती कसण्याचा मार्ग  खुला  झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

सदरील तेहतीस फुटाचा शिवरस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला  होता. हा रस्ता अतिक्रमण मुक्त करुन देण्यासाठी  ग्रामपंचायती आजी-माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य महसूल यांनी कठोर भूमिका घेतली. वडगाव लाख ते कार्ला हा रस्तावर खंडाळा, वडगाव लाख, होनाळा व कार्ला आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने कित्येक वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांना शेती कसणे कठीन बनले होते. या रस्ता साठी शेतकरी शाषण दरबारी सतत प्रयत्न  करीत होते तब्बल पंधरा वर्षानंतर हा रस्ता  खुला करण्यात आला.


 
Top