धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधानाची ओळख या विषयावर नुकतीच भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

सदर भितीपत्रिका  प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा स्वाती बैनवाड व प्रा.डॉ. डी.वाय. साखरे यांनी राज्यशास्त्र विभागातील निवडक विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे कडून संविधानाबद्दल माहिती संकलित करून ही भित्ती पत्रिका प्रकाशित केली. सदर भित्तिपत्रिकेचे प्रकाशन इंग्रजी विभागाच्या प्रमुख छाया दापके यांचे हस्ते  करण्यात आले. यावेळी राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी व महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाची ओळख या भित्तिपत्रिकेमुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख होण्यास मदत झाली. सूत्रसंचालन प्रा. स्वाती बैनवाड यांनी केले.


 
Top