कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यावर्षी 2025 च्या प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.समाजसेवेच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हा सोहळा 23 मार्च 2025 रोजी पर्याय सामाजिक संस्था, कळंब येथे येथे आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी समर्पित केले आहे. गरजूंच्या मदतीपासून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानापर्यंत तसेच सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाच्या सन्मानार्थ त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच, समाजाच्या विकासासाठी अविरत कार्य करणारे रमाकांत कुलकर्णी यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या अथक प्रयत्नांचा गौरव म्हणून त्यांनाही “जीवन गौरव पुरस्कार“ देण्यात येणार आहे.
यासोबतच खालील मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शरद केशवराव झरे, वैदेही सुधीर सावंत, विलासजी गोडगे, शिवराम कांबळे, रणजित बोबडे, बंडू आंबटकर, ॲड. राधाकृष्ण बलभीमराव देशमुख वरील सातही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील पंचेवीस ते पस्तीस वर्ष सामाजिक बदलासाठी कार्य केलेलं आहे.यात दुष्काळ, कोविड, पर्यावरण, महिला, बालके यांच्या साथी आयुष्यातील अनेक वर्ष कार्य केलेले आहे.
पुरस्कार समारंभाचे आयोजन
या प्रतिष्ठित पुरस्कार समारंभाचे आयोजन महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. एन. कोंढाळकर, राष्ट्रीय सचिव भूमिपुत्र वाघ, राष्ट्रीय संघटक रमाकांत कुलकर्णी, खजिनदार मनीषा घुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. याचबरोबर, मराठवाडा विभाग प्रमुख ओमप्रकाश गिरी, पुष्कराज तायडे आणि बालाजी शिंदे यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहणार असून,समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या या विभूतींचा सन्मानित करण्याची परंपरा गेली 28 वर्ष चालू असल्याची माहिती विश्वनाथ तोडकर यांनी दिली.