परंडा (प्रतिनिधी) - उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव यांनी ग्रंथोत्सव साजरा केला त्यावेळी परंडा येथील जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे ( गडंगणकार ) यांचा दि 24 रोजी सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन ग्रंथोत्सवात सहभागी झाल्या बद्दल सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे , गझलकार भागवत घेवारे , विचारवंत साहित्यिक युवराज नळे , राजेंद्र अत्रे व जिल्हयातील साहित्यिक मोठया संख्येने हजर होते.