धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था व संकल्प बहु उद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ रुपाली कोरे ,यशस्वी उद्योजिका शितल इंदापूरकर व तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सौ रूपाली कोरे मॅडम व मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे सत्कार होऊन संस्थेचे अध्यक्ष सौ जयश्री भुसारे यांनी प्रस्तावना केली. आदर्श महिला पतसंस्था गेली 17 वर्षे महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत असून आजच्या दिवशी नारी सन्मान करणे गरजेचे असल्याने विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करत असल्याचे सौ भुसारे यांनी सांगितले. तसेच लोहारा येथील अतिशय गरीब परिस्थितीत एमबीबीएस शिक्षण घेत असलेल्या कुमारी ऋतुजा कडगावे या या विद्यार्थिनीस आदर्श पतसंस्थेच्या वतीने व संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अनुक्रमे रुपये पंचवीस हजार व पाच हजार शंभर यासह शालेय साहित्य सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ रुपाली कोरे मॅडम यांच्या शुभहस्ते आर्थिक मदत देण्यात आली. तर अनसुरडा येथील सो अर्चना गोकुळ माने यांनी विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केल्यामुळे त्यांचा सत्कारही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था गेले दहा वर्षापासून आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत करत असून कुमारी ऋतुजा काडगावे या विद्यार्थिनीस गेल्या दोन वर्षापासून रोख स्वरूपात आर्थिक मदत देत आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री त्रिंबक कपाळे यांनी यावेळी नमूद केले. प्रारंभी संस्थेचे श्री कपाळे यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ रुपाली कोरे मॅडम , उपाध्यक्ष श्री हनुमंत भुसारे यांनी सौ इंदापूरकर व सचिव श्री प्रकाश स्वामी यांनी तेजस्विनी पाटील यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार केला.
आदर्श महिला सहकारी पतसंस्थेने या वेळी गृह उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळ्या मशिनरीं या ठिकाणी उपलब्ध करून देऊन गरजू महिलांसाठी अर्थ पुरवठा करणार असल्याचे सर्व उपस्थित महिलांना नमूद केले. यावेळी अर्थ सिद्धी बचत गटाच्या सौ चांदणे मॅडम, उद्योजिका इंदापूरकर, तेजस्विनी पाटील यांची महिलांना प्रेरणा देणारी भाषणे झाली तर रूपाली कोरे मॅडम यांनी महिलांनी घरच्या जबाबदाऱ्या स्वीकारून बाह्य परिस्थितीवर मात करून आपल्या मुली व मुलांवर फार काही लक्ष केंद्रित करून कौटुंबिक उन्नती करणे गरजेचे असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जयश्री भुसारे, उपाध्यक्ष सौ कोरडे, सचिव संजीवनी कपाळे, संचालिका सौ संगीता नकाते, राजश्री करजखेडे, संगीता स्वामी, संगीता तीर्थकर, नंदा घाडगे, मोहिनी कपाळे, कुंजवनी स्वामी, श्री सुरेश कोरडे, बाळासाहेब पाटील, लेखापरीक्षक श्री तांबारे यांची उपस्थिती होती तर संस्थेच्या व्यवस्थापिका सविता विभुते, अर्चना पाटील, अर्चना कोरडे, सुरेखा काथवटे, शिफा काझी, अर्चना ठोंबरे ,सागर नलावडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मधुकर जाधव यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव सौ संजीवनी कपाळे यांनी केले.