धाराशिव (प्रतिनिधी)- जहागिरदारवाडी तांडा येथे धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव, धाराशिव तहसीलदार डॉ मृणाल जाधव, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेळके यांनी रंगपंचमी बंजारा समाज बांधव सोबत साजरी करण्यात आले. त्यावेळी गावचे सरपंच शशिकांत राठोड, उपसरपंच बाबा चव्हाण, मुख्याध्यापक उत्तम चव्हाण, शेषेराव चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी संजय राठोड, एकनाथ माने, शहाजी राठोड, मनोहर चव्हाण, गोपीनाथ चव्हाण, देविदास राठोड, नामदेव चव्हाण, ग्यानदेव राठोड,अरुण चव्हाण, सुनिल चव्हाण, रेवा चव्हाण, मोतीराम जाधव, विजय चव्हाण, व गावातील समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.