धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने महिण्यातील दर 26 तारखेला अथवा इतर तारखेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येत आहेत,शाळा कॉलेज,नर्सिंग कॉलेज येथे संविधान वरती व्याख्यान घेण्यात आले आहे. जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान या विषयावर समितीचे कार्य चालू आहे. आज रोजी महिण्यातील तारखेनुसार वॉटसॲप ग्रुपवरती संविधान उद्देशिका व विश्लेषण पत्रक पाठवुन गुगल मिटच्या उपक्रमातुन सामुदायिक वाचनाचा हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला.

संविधानाचा जागर व गौरव करण्यात यावा म्हणुन समितीच्या वतीने राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात असुन हर घर संविधान हा उपक्रम राबविण्यात यावा, संविधानाची जागृती व्हावी,शाळा कॉलेज मध्ये संविधान शिकविण्यात यावे, विद्यार्थ्यां पासुन ते जनसामान्यांपर्यंत संविधानाचे महत्व कळण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी वारंवार केलेली आहे. गुगल मिटमध्ये अब्दुल लतिफ यांनी प्रस्ताविकेत आत्तापर्यंत समितीच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करून अनोखी परी वाघमारे व गौरव वाघमारे यांनी संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन घेतले. यावेळी अब्दुल लतिफ,गणेश वाघमारे, बाबासाहेब गुळीग,सचिन चौधरी,तर तब्बसुम ताई सय्यद,किरणताई निंबाळकर,अभिमान हंगरगेकर,रौफ शेख, राजेंद्र धावारे,नामदेव वाघमारे,सचिन दिलपाक यांनी देखील संपर्क साधला.

 
Top