तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील  उमरगा चि येथे  बारावी पास झालेला  बोगस डॉक्टरला तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथकाने सोमवार दि. 3 मार्च रोजी दवाखान्यात जावुन ताब्यात घेतले.

सोमवार  दि.  3 मार्च  रोजी सांयकाळी सात वाजता  उमरगा (चि), ता. तुळजापूर या गावात  डॉ. अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथक गेले असता  असता डॉ. श्री निरापद अनिल बानर्जी वय 60 वर्षे, रा. बोली, जि. सवाई माधोपुर राज्य राजस्थान ह.मु उमरगा (चि) ता. तुळजापूर याचा दवाखान्यात उमेश ज्ञानेश्वर लोहार आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य अणदुर यांना पेशंट म्हणून पाठविले.  डॉ. श्री निरापद बानर्जी  यांनी तपासणी  करून रूपये 100 रुपये  फिस घेतली आणि औषधोपचार  केले. याची अधिक माहीती काढली असता मागील पाच महिन्यापासून सदरचा डॉक्टर या गावामध्ये प्रॉक्टीस करीत असल्याचे सांगितले गेले. त्यांनतर तपासणी पथकांने संबंधित डॉक्टर ज्या पॅथीचे उपचार करतो त्या पॅथीचे वैद्यकीय प्रमाणपत्र अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सदर डॉक्टारांना सांगण्यात आले.

त्यामध्य (indian Council of alternative medicines  Registered by the govt of west bangal ч (RMP indo Allopathy System of medicine date of issue date 14/02/1995)  14/02/1995) देण्यात आले. हे  प्रमाणपत्र बोगस होते. श्री निरापद बानर्जी इयत्ता 12 वी पर्यत शिक्षण झाले असून त्यांच्या कडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचे कुठलेही प्रमाणपत्र नाही. त्याच्या विरूध्द वैद्यकीय ड़ाँ अन्सारी तालुका आरोग्य अधिकारी  तुळजापूर यांनी फिर्याद दिल्यावरुन नळदुर्ग पोलिसांनी 33(2),15, 319(2),318(4)अन्वय  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top