तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील ड्रग्ज प्रकरणी  पोलिसांनी शहरातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. आज पर्यत मुंबईचे आरोपी अटक होत होते. माञ तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील पिंन्टु मुळे ताब्यात घेताच, चौकशीला वेग आला आहे. तीन स्थानिक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. माञ तुळजापूर ड्रग्ज रँकेटचा सर्वेसर्वा आका आजपर्यत या प्रकरणा पासुन दूर असल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील तरुणांना नशेचा गर्तत अडकवणारा आका कधी पोलिसांचा ताब्यात येणार? असा सवाल शहरवासिय करीत आहेत. या नंतर आणखी कुणाकुणाचे नंबर लागणार चर्चा शहरात होत आहे.

ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी 12 जणांना आरोपी केले असुन त्यातील 9 जणांना अटक केली आहे. तर 3 आरोपी फरार आहेत. 3 आरोपी जेलमध्ये आहेत. तर उर्वरित 3 जण पोलिस कोठडीत आणि 3 जणांना अटक केली आहे. आता पोलिस स्थानिक रँकेट उध्दवस्त करण्याकडे तपास सुरु असल्याचे दिसत आहे. ड्रग्ज पेडलर व ड्रग्जचे सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर असुन सेवन करणाऱ्याच्या माध्यमातून ड्रग्ज पेडलर, तस्कर हाती लागतात का ? याचा शोध घेतला जात आहे. या अटकेमुळे शहर वासियात एकच खळबळ उडाली असुन हे पुर्वीच रोखले असते तर ड्रग्ज व्याप्ती वाढली नसती. ड्रग्ज रँकेट कुणाचा छत्रछायेत फोफावत  होते त्याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.


 
Top