भूम (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची मानवतेला काळिमा फासणारी निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीना फरार होण्यासाठी, तसेच गाडी, आर्थिक, मदत करणाऱ्या सर्व आरोपीना तात्काळ अटक करुन मोका व 302 अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
बीड येथे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीमुळे आरोपीनी निर्घृण हत्या केली. यातील आरोपी अटक आहेत. त्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. काल समाज माध्यमासमोर हत्तेचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. त्यात आरोपी सैतानाला लाजवेल असे स्व संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसून आले आहे. मारहाण करताना त्याच्या चेहऱ्यावर आसुरी हसू दिसत आहे. मारहाण करताना त्याच्या तोंडात लघु शँका केल्याचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. हे सगळं पाहता महाराष्ट्रात मानवता जिवंत आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीना कसलीही दया आली नाही. उलट या मारहाणीचा व्हिडीओ व फोटो शूट केले गेले. अशा नाराधम आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व हस्तकांना तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर मोकोका व 302 अंतर्गत सह आरोपी करुन अटक करण्यात यावी. तरच देशमुख कुटूंबाला न्याय मिळेल. विश्व् भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहताना या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी कायदे बनवले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची हिच खरी वेळ आहे. आम्ही सर्व बौद्ध समाज बांधव या घटनेचा तीव्र निषेध करतो. व तात्काळ आरोपीना मदत करणाऱ्या सर्व आरोपीना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करतो. यावेळी भीमसैनिक चंद्रमणी गायकवाड, महेंद्र गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे दत्ता साठे, पत्रकार श्याम पालके, आनंद शिंदे, वीनोद वाघमारे, कदू जानराव, संतोष माने, श्रवण जावळे,विकी जावळे यांनी निवेदन दिले.