धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. सभागृहात AI तंत्रज्ञान वापरा म्हणून शेतकऱ्यांना उपदेश करणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात  शेतकऱ्यांना फासावर लटकवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. विधानसभा निवडणुकीत घसा कोरडा पडेपर्यंत देवेंद्र फडणवीस, अजित पवार,एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी करू म्हणून शेतकऱ्यांना सांगितलं होतं. या अर्थ संकल्पात शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनापासून या सरकारने पळ काढला आहे अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे हनुमंत पवार यांनी दिली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जाचा डोंगर झाला आहे. यातून दररोज आत्महत्या होतं आहेत. सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यात अपयशी ठरलेलं सरकार भावांतर योजनेच्या स्वतःलाच्याच आश्वासनावर तरी गांभीर्याने विचार करून दिलासा देईल अशी अपेक्षा होती तीही फोल ठरली. नमो शेतकरी सन्मान निधीत कोणतीही वाढ नं करणारं सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नाही हेच अधोरेखित होतं. इतर विभागाच्या तुलनेत राज्याच्या कृषी विभागाला वर्षभरासाठी दिलेला निधी ही कमी आहे. त्यामुळे सभागृहात शेतकऱ्यांसाठी प्रस्तावित इतर योजनाच्या अंमलबजावणीवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. 

 
Top