भूम (प्रतिनिधी)- ग्रामीण रुग्णालय भूम येथे शालेय आरोग्य तपासणी जनरल सर्जरी कॅम्प आयोजित करण्यात आला. तपासणी अंतर्गत एकूण 23 शस्त्रक्रिया झाल्या.त्यापैकी फायमोसिस 8, तंग टाय 14 व गाठीच्या शत्रक्रिया 1 पार पडली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष भूम तालुकाप्रमुख पांडुरंग धस यांनी कॅम्प घेण्यासाठी पुढाकार घेतला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ सुजित नायकल, डॉ. वाघमारे ( सर्जन), डॉ.पडवळ (भूलतज्ञ), डॉ. चाकोते(मेडिकल ऑफिसर), डॉ. शेख, डॉ. अरके, श्रीमती. कोल्हे सिस्टर, खैरे राम, राजकुमार पाखरे, नाथा कांबळे व श्रीमती अंधुरे यांच्या उपस्थितीत जनरल सर्जरी कॅम्प पार पडला.
शालेय विद्यार्थ्यांना गंभीर आजार असल्यावर त्याच्यावर उपचार करण्यात येईल. कोणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही. असे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ सुजित नायकल यांनी व्यक्त केले. एकनाथ हिरक आरोग्य वर्ष अंतर्गत उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश चिवटे, राज्यप्रमुख राम राऊत, संपर्क प्रमुख सचिन मांजरे, यांच्या नेतृत्वाखाली,भूम तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्यासाठी, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील शासकीय विविध योजना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने तालुक्यातील शेवटच्या घटकातील गरजू रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहचविणार असे प्रतिपादन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख भूम पांडुरंग धस यांनी केले.