परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्याचे सुपूत्र आणि बार्शी येथील साईसंजीवनी मल्टीस्पेशालिटी हॅास्पीटलचे सर्वेसर्वा व प्रख्यात कॅन्सरतज्ञ डॅा. श्री. राहुल मांजरे पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता डॅा. राहुल मांजरे यांचा भाजपा नेते माजी आमदार  सुजितसिंह ठाकूर यांनी फेटा बांधून आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. श्री. संतोष सुर्यवंशी, श्री. सचिन मांजरे पाटील, डॅा. श्री. सचिन गुटाळ, श्री. हेमंत कारकर, श्री. महेश प्रतापे आदी उपस्थित होते.  कॅन्सरतज्ञ डॅा. मांजरे हे शेतकरी कुटुंबातील असून सर्वसामान्य रूग्णांना सेवा देण्याचे कार्य सेवाभाववृत्तीने आणि प्रामाणिकपणे करीत आहेत. यावेळी कॅन्सर व विविध आजारांचे वाढते प्रमाण तसेच केंद्र व राज्य सरकारकडून आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता, महात्मा फुले जनआरोग्य अशा विविध योजनेअंतर्गत गरजू रूग्णांना होत असलेली मदत आणि आरोग्यसेवा आदी विषयावर चर्चा झाली.

 
Top