तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे हरभरा गंजीस आग लागून तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 24 फेब्रुवारीला सायंकाळी नऊच्या दरम्यान घडली.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील चरणसिंग राजपूत यांच्या तेर शिवारातील गट क्रमांक 410 मधिल सहा एकर हरभरा काढून गंज लावण्यात आली होती.अज्ञात व्यक्तीनी 24 फेब्रुवारीला सायंकाळी नऊच्या दरम्यान आग लाऊन गंज जळाली.या घटनेसंदर्भात ढोकी पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास तेर बिटचे बिट अंमलदार प्रदिप मुरळीकर करीत आहेत.


 
Top