धाराशिव (प्रतिनिधी)- बिहार येथील बुध्द गया महाबोधी विहारासाठी दि.12 फेब्रुवारी 2025 पासुन बौध्द भिक्खु, भिक्खुणी व नागरिक यांचे बेमुदत आमरण उपोषण चालू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीने पाठिंबा दिला.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, उपोषणास पंधरा दिवस उलटले आहेत परंतु बिहार राज्य सरकारने याबाबतीत आणखी लक्ष दिले नसुन उपोषणकर्त्याची तब्बेत खालावली जात आहे. महाबोधी विहारातील आयोजन व जबाबदारी बौध्द धर्मीयाकडे सोपविण्यात यावी, सन 1949 मध्ये महाबोधी विहारातील नियोजनासाठी नियम बनवुन नऊ जणांची समिती बनविण्यात आली होती. या समितीत चार बौध्द व पाच ब्राह्मण समाज बांधवांचा समावेश असुन ब्राम्हण सदस्याकडुन येथे ब्राह्मणीकरण केले जात आहे. यासाठी पुर्ण बौध्द समाजाकडे याचे नियोजन सोपविण्यात यावे. बौध्दांच्या धार्मिक विषयी राज्याचा हस्तक्षेप संपला पाहिजे. कारण महाबोधी विहाराचे मालकच सम्राट अशोक आहेत. ज्यांनी एक लाख सोन्याची नाणी खर्च करून हे महाविहार बनविले आहे आणि आज महंत ब्राह्मणांनी यावरती कब्जा केला आहे. यासाठी बिहार राज्यातील बुध्द गया येथील महाबोधी विहारासाठी जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणुन आम्ही समस्त समाज बांधव समर्थन करत आहेत. बिहार राज्य व केंद्र सरकारने याची दखल घेऊन न्याय देण्याचे करावे असे लेखी निवेदन फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत देण्यात आले आहे. निवेदनावर गणेश वाघमारे, बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,संजय गजधने, प्रविण जगताप,संग्राम बनसोडे,संपतराव शिंदे, अंकुश उबाळे,बलभीम कांबळे,स्वराज जानराव, रमेश कांबळे सह इतरांच्या सह्या आहेत.