भूम (प्रतिनिधी)- कोल्हापूर येथे पार पडलेल्या अत्यंत भव्य अशा प्रोऍक्विव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन 2025 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाडोंग्री येथील दुसरीतील व शिवश्रेया प्रोऑक्टिव्ह अबॅकस क्लासची विद्यार्थ्यांनी आरोही गजानन चव्हाण हिने सायकल विनर अबॅकस मध्ये लहान गटात राष्ट्रीय पातळीवर देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल आरोहीला अबॅकसच्या वतीने सायकल प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये तन्मय नागेश तळेकर, शुभ्रा काशिनाथ जावळे, श्रुती ज्ञानेश्वर शिरसागर, लक्ष्मण अतुल वाघमारे, संस्कार शंभोलिंग साखरे या विद्यार्थ्यांनी देशात तर राज्यामध्ये स्वरा ऋषिकेश तळेकर, विराज विशाल कदम, गायत्री विपुल तळेकर, कृष्णा मिथुन चव्हाण, राजवीर दत्तात्रय जावळे, शिवन्या तानाजी पेंडपाले, चंद्रशेखर सुजित घोंगडे, कार्तिक शरद तळेकर विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीच्यातुर्याची कमाल दाखवत विविध कॅटेगिरीच्या रॅकवर अमृत्ता क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शालेय समिती हाडोंग्रीचा वतीने शाल श्रीफळ गुच्छ देऊन सन्मान केला. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन गोवर्धन, शिवश्रेया प्रोऑक्टिव्ह अबॅकस क्लासच्या अमृता क्षीरसागर, मुक्ताप्पा तळेकर, माजी पंचायत समिती सदस्य उपसरपंच रवींद्र लोमटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ जावळे, भगंवत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील डोके, रविकिरण भोजने, श्रीमती राख मॅडम, सुधीर शिरसागर, अमृता वाघमारे, संध्या कदम, नैनी साखरे, गीता चव्हाण, आशा जावळे, जना बेलकर, अन्नपूर्णा तळेकर, वनिता तळेकर, विद्या तळेकर यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top