भूम (प्रतिनिधी)- सामाजिक क्रांतीचे जनक संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधून तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथील भगवंत विद्यालयात स्वयं शासन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित पंचायत समितीचे माजी सदस्य मुक्ताप्पा तळेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर प्रमुख उपस्थितीत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की, विद्यार्थिना जिद्द, चिकाटी, स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. येणारा काळा विज्ञानवादी असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी असा मोलाचा सल्ला पाटील यांनी दिला.

या कार्यक्रमासाठी स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक रिद्धी तळेकर, स्वयंशासन दिनाचे गटशिक्षणाधिकारी दिशा तळेकर, भगवंत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अनिल तळेकर, श्रीमंत शिंदे, नवनाथ डांबरे, मुख्याध्यापक सुनील डोके, उपसरपंच रवींद्र लोमटे, त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शांतलिंग घोंगडे, प्रकाश भाले, रमेश सुतार, पद्मिनी कवडे, कल्पना शिंगटे, भरत शिरसागर, रेवन बिडवे, महेश डंबरे, विकास तळेकर, रामा सुरवसे, कमलाकर पोतदार यांच्यासह स्वयंशासनचे नैत्री लोमटे, सुहानी जगदाळे, भक्ती डमरे, निकिता डंबरे, प्रज्ञा शिरसागर, ऋतुजा महाडिक, यथार्थ नागटिळक, धीरज थोरात, नागेश साखरे, ज्ञानेश्वर दांईगडे, सुजल डमरे,  विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पवार यांनी केले. तर आभार पद्मिनी कवडे यांनी मानले.

 
Top