तुळजापूर (प्रतिनिधी)-शाकंभरी नवरात्र महोत्सवात जलयात्रेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रांगोळी मध्ये सहभागी झालेल्या मुख्याध्यापक २ शिक्षक व २० विद्यार्थिनींचा संस्कार भारती तुळजापूरच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
तुळजापूर संस्कार भारतीच्या वतीने शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तुळजाभवानी देवीचे राजे शहाजी महाद्वार अशी रांगोळी ची मोठी पायघडी काढण्यासाठी सहभागी झालेल्या जिजामाता कन्या प्रशालेच्या 20 विद्यार्थ्यांनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी व. ग. सूर्यवंशी, देवगिरी प्रांताचे सह महामंत्री डॉ सतीश महामुनी, प्रांताचे दृश्यकला सहसंयोजक पद्माकर मोकाशे, तुळजापूरचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे, उपाध्यक्ष सौ. माधुरी कनगरकर ,जिल्हा सदस्य सौ गीताभाभी व्यास, रांगोळी कलावंत निलेश व्यास, मुख्याध्यापक श्रीमती सुरेखा मेटकरी, सहशिक्षक धनंजय कुंभार, सहशिक्षक साळुंखे याची याप्रसंगी उपस्थिती होती.
या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेखा मेटकरी यांनी केले. मुख्याध्यापक सुरेखा मेटकरी, शिक्षक धनंजय कुंभार, शिक्षक राहुल कोकरे यांना शाल आणि प्रमाणपत्र देऊन या निमित्ताने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संस्कार भारतीच्या वतीने पद्माकर मोकाशी व डॉक्टर सतीश महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राहुल कोकरे यांनी केले व आभार प्रदर्शन धनंजय कुंभार यांनी मानले. प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.