धाराशिव (प्रतिनिधी)-भारत देशाचे यशस्वी आणि कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशाच्या उज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीपूर्ण आज आपला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला मजबूत करणारा अर्थसंकल्प असून देशातील सर्व घटकांना न्याय देत पायाभूत विकास कामांना गती देत देशाला पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाबद्दल मोदी सरकारचे हार्दिक अभिनंदन भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष  नितीन काळे यांनी केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की या अर्थसंकल्पात महिला उद्योजकांसाठी भरीव तरतूद केली असून महिला सक्षमीकरणासाठी बळ देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.  

सर्वसामान्यांना 12 लाखांपर्यंत करमुक्त करण्यात आले आहे ही सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट आहे.  देशातील सर्वात मोठा घटक हा सर्वसामान्य आहे.सर्वसामान्यांच्या निवाऱ्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करून बेघरांना प्रचंड मोठा दिलासा दिला आहे.  त्यांना आधार दिल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आभारी असून देशातील सर्वसामान्यांबद्दल असलेली तळमळ व प्रयत्नांची पराकाष्टा यातून दिसून येते. विरोधकांना काही बोलण्यासारखे राहिलेले नाही. विरोधकांनी जनतेचा खिसा रिकामा करून त्यांची आर्थिक पिळवणूक केलेली आहे परंतु सध्याचे मोदी सरकार जनतेच्या गरजेचे प्रश्न मार्गी लावून त्यांचा खिसा भरण्याचे काम करत आहे. ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे, त्यामुळेच मध्यमवर्ग सरकारच्या पाठीशी आहे,  त्यांच्यासाठी मोठा मास्टरस्ट्रोक सरकारने मारला आहे. विरोधकांनी ज्याचा विचारही केला नव्हता असा हा निर्णय आहे. गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी बळ देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. तसेच सूक्ष्म व लघु उद्योगासाठी भरघोस तरतूद करून औद्योगिक विकासाला चालना देण्याचे काम सरकार अखंड करत आहे. यामुळेच देशाच्या विकासाची घोडदौड अखंड चालू राहील, एकूणच हा आजचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा असून अबालवृद्धांच्या स्वप्नपूर्तीचा अर्थसंकल्प आहे. असे मत श्री नितीन काळे यांनी बोलताना यावेळी व्यक्त केले.


 
Top