धाराशिव (प्रतिनिधी)- आज 25 फेब्रुवारी 2025 रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिनानिमित्त मरणोत्तर नेत्रदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय  येथील नेत्र शल्यचिकित्सक  डॉ. ज्योती कानडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी ते  म्हणाले की, “नेत्रदान करणे सामाजिक काम आहे. आपल्या नेत्रदानामुळे इतरांना दृष्टी लाभते हे पुण्य कर्म आहे. भारतात दरवर्षी कमीत कमी एक लाख लोक अंध आहेत. परंतु नेत्रदान करणाऱ्यांची संख्या 25000 आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी नेत्रदान ही चळवळ झाली पाहिजे. पुढे येऊन प्रत्येकाने नेत्रदान केले पाहिजे असे आवाहन केले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.छाया दापके म्हणाले की,वस्त्रदान, औषधदान, विद्यादान, यापैकी नेत्रदान ही देखील आज काळाची गरज आहे. नेत्रदानामुळे समाजात अनेक समज गैरसमज आहेत. नेत्रदान करताना डोळे काढले जात नाही तर कार्निया म्हणजे डोळ्यावरील पटल. काढून घेतले जाते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासाच्या आत हे डोळ्यावरील दृष्टीपटल  काढल्यानंतर गरजू अंध व्यक्तींना कार्निया लावून दृष्टी देता येते. कावीळ,  कॅन्सर,  एचआयव्ही झालेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. भविष्यामध्ये तरुण पिढीने पुढे येऊन नेत्रदान चळवळ अधिक प्रभावी करावे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. बालाजी नगरे यांनी केले. आभार प्रा. मोहन राठोड यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले.

 याप्रसंगी डॉ. सावता फुलसागर, डॉ. स्वाती  जाधव, प्रा. डोळे मॅडम, प्रा. आकोसकर मॅडम, प्रा. वाघ, प्रा. चौखंडे, प्रा. डॉ. वैशाली बोबडे,  शासकीय रुग्णालयाचे गोरे आदीसह  विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

 
Top