धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील पोलीस हवालदार दीपक लाव्हरेपाटील यांची नॅशनल शुटींग बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे.

भोकरदन येथे नुकत्याच पार पडलेल्या 38 व्या महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी मध्ये 26 जिल्ह्यांनी सहभाग घेतलेला होता. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातून पोलीस कॉन्स्टेबल दीपक लाव्हरे यांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत हे महाराष्ट्र संघातून कामगिरी बजावणार आहेत.यासाठी दीपक लावले पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


 
Top