धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेश सचिवपदी गडदेवदरी येथील इफ्तेखार पाशा मुजावर यांची निवड करण्यात आली आहे.अल्पसंख्यांक विभागाचे राज्यप्रमुख इद्रिस नायकवडी यांनी ही निवड केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, कार्याध्यक्ष मा. खा.प्रफुल भाई पटेल प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनील तटकरे साहेब यांचे विचार तळागाळातील अल्पसंख्यांक समाजात पोहचवावे असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय मुंबई येथे इफ्तेखार पाशा मुजावर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडेे,अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष असदखान पठाण, शहराध्यक्ष सचिन तावडे, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष लतिफभाई पटेल, युवक जिल्हा सचिव सुदर्शन करंजकर, इलियास अब्दार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करुन इफ्तेखार पाशा मुजावर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top