धाराशिव (प्रतिनिधी)- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोष राऊत व तहसीलदार मृणाल जाधव यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले.नियोजित बाबी व जागेसंदर्भात उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, तहसिलदार मृणाल जाधव यांना माहिती गणेश रानबा वाघमारे यांनी दिली.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तथागतास वंदन व पेढे वाटप करुन अभिवादन करण्यांत आले.यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, तहसिलदार मृणाल जाधव, धनंजय राऊत,बबन वाघमारे,सिध्दार्थ बनसोडे,गणेश वाघमारे,संजय गजधने,प्रविण जगताप,संग्राम बनसोडे,बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,पुष्पकांत माळाळे, अभिजीत देडे,बाबासाहेब गुळीग,ॲड.अजय वाघाळे,अंकुश उबाळे,बलभीम कांबळे संपतराव शिंदे,रमेश कांबळे,अतुल लष्करे,स्वराज जानराव,राजाराम बनसोडे, अमोल वाघमारे,रोहित शिंगाडे,संतोष वाघमारे विकी नाईकवाडी,सचिन दिलपाक,राजगीर संस्थेचे नागनाथ गोरसे,ॲड.अनुरथ नागटिळक,सिद्राम वाघमारे, संजय सरवदे, रोहित गाडे तर नगर परिषद धाराशिवचे संजय कुलकर्णी,संतोष गायकवाड, भारत साळुंखे,सुनिल उंबरे, शिवाजी वाघमोडे,शितल बनसोडे,दिंगबर डुकरे,अजय जानराव अन्य इतर उपस्थित होते.सुत्रसंचलन धनंजय वाघमारे यांनी केले तर आभार सिद्धार्थ बनसोडे यांनी मानले.