धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा येथे सार्वजनिक शिवजयंती रॅली दरम्यान अदलीचा स्फोट होवून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुरघटनेत अक्षता संतोष भराटे (वय 12) आणि महेंद्र किंचक गवळी (वय 35) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारा येथे शिवजयंती महोत्सवनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी दुपारी उत्साहात रॅली निघाली होती. यावेळी लोखंडी नळीमध्ये फटाक्याची दारू भरून हवेत उडवल्या जाणाऱ्या अदलीचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. सदर स्फोटाचा पोलिस तपास करीत आहेत.