धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस गडपाटी ,धाराशिव, येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी,मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील नवीन रोजगाराच्या व व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त डॉ.प्रतापसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवशीय कॅम्पस टू कॉर्पोरेट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व औषध निर्माण क्षेत्रातील वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी विषयी माहिती दिली. या कार्यशाळेत बोलताना  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ट्रेनर श्री. संतोष सांगवे, यांनी औद्योगिक क्षेत्रातील तसेच औषध निर्माण क्षेत्रातील वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत विकासाविषयी सखोल असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी काळाच्या गरजेनुसार वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून स्वतःचा व राष्ट्राचा विकास कसा साधता येईल या विषयी माहिती दिली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी बहुमोल असे उपयोगी ठरणार आहे. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील जवळपास 150  विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. विक्रांत नवले व प्रा. विजय सुतार यांनी परिश्रम घेतले.

 
Top