धाराशिव (प्रतिनिधी)- शरीराच्या सवयी, व्यसन खाण्या पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे जीवनशैलीचा अंत होत आहे किंबहुना आजार बळावत चाललेले आहेत. बरेच आजार आपण वाचू शकतो. प्राथमिक अवस्थेत आजार असताना वेळीच उपचार करून घेतला तर दुर्धर आजार होणार नाहीत. आपण निरोगी आहोत हे आरोग्य शिबिरात मोफत उपचार करून सिद्ध करावे असे आवाहन शासकीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.

 ते शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय व राष्ट्रवादी शिक्षक संघ, ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने 10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनानिमित्त दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी पळसप येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय मधील डॉक्टरांनी भव्य सर्व रोग निदान शिबिर घेतले याप्रसंगी  उद्घाटक म्हणून डॉ. चाकूरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरचे आ. विक्रम वसंतराव काळे होते.

 अध्यक्षीय समारोपात आ.विक्रम काळे म्हणाले की अंगावर आजार काढू नये.सर्वांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे.गाडीची सर्व्हिसिंग करतो तसे लोकांच्या आरोग्याची पण सर्व्हिसिंग केली पाहिजे.  या शिबिरात बालरोगतज्ञ डॉ.नितीन भोसले, सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्वप्निल सांगळे, डॉ.विवेक कोळगे, हृदयरोग तज्ञ डॉ. रंजीत कदम, सहाय्यक प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर मेनबुले,डॉ. अनुजा कंदले, डॉ.क्षितिजा बनसोडे, डॉ. किरण देशमुख, अस्थिरोग तज्ञ डॉ. विनोद बर्वे, नेत्र चिकित्सक डॉ. निलेश कुरील आदींनी  सुमारे 500 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.

पळसप गावांमध्ये यावेळी पशु चिकित्सा शिबिर घेण्यात आले  प्राचार्य डॉ. रमेश दापके  यांनी उद्घाटन केले. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शरदचंद्र लाकाळ, डॉ.आर. डी. जाधव,पशुधन पर्यवेक्षक डॉ.भारत कुंभार, डॉ.क्षीरसागर,सचिन कर्णवाल यांनी सुमारे 76 जनावरांची तपासणी व लसीकरण  केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रदीप इंगळे यांनी केले दिवंगत आमदार वसंतराव काळे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.

आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिल काळे,गंगाधर आरडले, प्रा अंकुश नाडे, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, बालाजी तांबे राजकुमार मेंढेकर, प्रा. ज्ञानोबा गायकवाड, सरपंच सिद्धेश्वर काळे, उपसरपंच राम लाकाळ, तंटामुक्त अध्यक्ष विजय करंजकर आदींनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे  आभार डॉ.रणवीर काळे यांनी मानले.


 
Top